MPSC राज्यसेवा

 

MPSC राज्यसेवा परीक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी ही परीक्षा घेतली जाते. राज्याच्या प्रशासनामध्ये उपजिल्हाधिव पोलीस उपअधिक्षक, तहसिलदार, सहाय्यक विक्रीकर आयुक्त, तहसिलदार, मुख्याधिकारी, शिक्षणाधिकारी, | अभिलेख अधिक्षक, नायब तहसिलदार, कक्षाधिकारी, सहाय्यक परिवहन अधिकारी इ. पदावरील अधिः । निवडण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा ३ टप्प्यांत घेतली जाते.

 

१) पूर्व परीक्षा

 

ही चाळणी परीक्षा आहे. लाखो विद्यार्थ्यांमधून निवडक विद्यार्थी चाळून मुख्य परीक्षेसाठी त्यांना पात्र ठरविणे हा परीक्षेचा हेतु आहे. पूर्व परीक्षेत मिळालेले गुण अंतिम निवडीसाठी विचारात घेतले जात नाहीत. पूर्व परीक्षा बहुपर स्वरुपाची असून त्यामध्ये चूकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जातात.

 

पूर्व परीक्षा स्वरूप

 

पेपर विषय गुण वेळ प्रश्न
पेपर १ सामान्य अध्ययन २०० २ तास १००
पेपर २ CSAT २०० २ तास ८०
 
२) मुख्य परीक्षा

 

हा निवडीचा टप्पा आहे. मुख्य परीक्षेत मिळालेले गुण अंतिम यादीतील पद निश्चित करताना विचारात घेतले जातात.

 

मुख्य परीक्षा स्वरूप

 

पेपर विषय गुण वेळ
पेपर १ मराठी + इंग्रजी १०० ३ तास
(पेपर १ वर्णनात्मक स्वरुपाचा असून विद्यार्थ्याला सुवाच्च अक्षरात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहावी लागतात)
पेपर २ मराठी + इंग्रजी १०० २ तास
पेपर ३ सामान्य अध्ययन १ १५० २ तास
पेपर ४ सामान्य अध्ययन २ १५० २ तास
पेपर ५ सामान्य अध्ययन ३ १५० २ तास
पेपर ६ सामान्य अध्ययन ४ १५० २ तास
  एकूण ८००

(पेपर २ ते ६ बहुपर्यायी स्वरुपाचे आहेत. या पेपर्सला नकारात्मक गुणपद्धती लागू आहे. म्हणजेच चूकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जातात).

 

३) मुलाखत (१०० गुण)

 

विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वाची चाचणी घेणे हा मुलाखतीचा उद्देश आहे.

मुख्य परीक्षेचे ८०० गुण आणि मुलाखतीचे १०० गुण मिळून एकूण ९०० गुणांपैकी मिळालेल्या गुणांनुसार अंतिम यादी जाहीर केली जाते.